Uddhav Thackeray And Bhagat Singh koshyari
Uddhav Thackeray And Bhagat Singh koshyari saam tv

Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात ? उद्धव ठाकरे यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

'राज्यपाल कोश्यारी यांची वक्तव्य बघितल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात', अशा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करत कोश्यारींवर निशाणा साधला.

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यापाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर जोरदार टीका केली. 'राज्यपाल कोश्यारी यांची वक्तव्य बघितल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात', अशा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करत कोश्यारींवर निशाणा साधला. ( Uddhav Thackeray News In Marathi )

Uddhav Thackeray And Bhagat Singh koshyari
या गोष्टी राज्यपालांकडून होत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा - शरद पवार

शुक्रवारी मुंबईच्या अंधेरी येथील एका कार्यक्रमात 'गुजराती लोक मुंबईतून गेले, तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही', असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपाल कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत कोश्यारींवर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले, 'राजपाल हे मानाचं पद आहे. राजपालपदाचा मी अपमान करु इच्छित नाही. कोश्यारींनी राज्यपालांच्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात'.

Uddhav Thackeray And Bhagat Singh koshyari
मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही - एकनाथ शिंदे

ठाकरे पुढे म्हणाले, 'आज त्यांनी कहर केला आहे. त्यांची भाषणे मुंबईतून येतात की दिल्लीतून येतात हा संशोधनाचा विषय आहे. राज्यपालांनी डोंगर,गड-किल्ले, पैठणी खाद्यपदार्थ आहेत. हे त्यांनी गेल्या दोन-अडीच वर्षात पाहिलेले असतील. मात्र, त्यांनी कोल्हापूरचा जोडा पाहिलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना जोडा दाखविण्याची गरज आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com