Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून हल्लाबोल; म्हणाले,आनंद आहे, पण...

उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून हल्लाबोल
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam tv

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिनानिमित्तच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 'आज विधानभवनात तैल चित्राचं अनावरण होतंय. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावत आहे. त्याचा आनंद आहे, पण त्यांचा हेतू चुकीचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार, आता पुढे काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.

उद्धव ठाकरे उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले, 'तेच चैतन्य तोच उत्साह तोच जोष आणि तीच गर्दी पाहायला मिळत आहे. मी पाच दहा मिनिटं बोलणार आहे. गद्दार विकले जाऊ शकतात, पण हे जे आहे ते खोक्यानी विकता येत नाही. संजय राऊत अनुभव सांगत होते, मला पण एक माहिती कळाली. मला थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. काळजीमध्ये होते. ते म्हटले मी भाजपमध्ये चाललो. उद्या एक बातमी येईल, अध्यक्ष मिंधे गटात किंवा भाजपात गेले, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

'आज प्रकाश आंबेडकर आपण एकत्र आलो. काही वर्षांपूर्वी रामदास आठवले आम्ही एकत्र आले. मात्र , रामदास आठवले भाजपकडे गेले. आता दोन महापुरुषांचे नातू एकत्र येत आहे. आज विधानभवनात तैल चित्राचं अनावरण होतंय. ज्या कलाकारांनी रेखाटले. त्यांना मला काय बोलायचं नाही. तैलचित्र लावत आहे. त्याचा आनंद आहे, पण हेतू चुकीचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com