Uddhav Thackeray : देश हुकूमशाहीच्या दिशेनं निघाला; उद्धव ठाकरे यांनी डागली भाजपवर तोफ

जे.पी.नड्डा यांचं देशात फक्त भाजप टिकणार हे वक्तव्य देशाला वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे हे भाजपवर कडाडले.
uddhav Thackeray
uddhav Thackeray saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर आता संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. ' सर्व लोकांनी डोळे, कान उघडून देश कुठे चालला आहे, भाजप (BJP) कुठे नेऊ इच्छित आहे, त्यांना मदत करायची का हे ठरवायची वेळ आहे. जे.पी.नड्डा यांचं देशात फक्त भाजप टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे हे भाजपवर कडाडले.

uddhav Thackeray
मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'भाजपला वंशवादाच्या विरोधात लढायचं आहे. पण भाजपमध्ये इतर पक्षातून लोक येत आहेत. मग भाजपचा वंश कोणता आहे ? त्यांच्या सोबत जे येतील ते म्हणजे त्यांचे गुलाम होतील हे त्यांचे लोक होतील. म्हणजे देशाची गुलामगिरीकडे वाटचाल सुरू आहे'.

uddhav Thackeray
Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? नांदेडमध्ये चर्चांना उधाण

भाजपच्या राजकारणावर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'राजकारण बुद्धीबळ आहे. त्यांना बुद्धी नाही म्हणून बळाचा वापर करत आहे. म्हणून इतरांना संपवत आहेत. पण दिवस फिरतात. ते फिरले की काय होईल याचा विचार भाजपने करावा'. संजय राऊत यांना ईडीने केलेल्या अटकेवर भाष्य करताना त्यांनी 'संजय राऊत यांचा अभिमान आहे', असे ठाकरे यांनी सांगितले. संजय माझा जुना मित्र आहे. संजय हा पत्रकार, शिवसैनिक आहे. त्यांना जे पटत नाही, त्यावर ते भाष्य करतात', असे ते म्हणाले.

'नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणावर भाष्य केलं. त्यानुसार राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही, पण आताच्या राजकारणाची घृणा वाटते. भाजपला इतर पक्ष संपवायचे, तर जनतेत जा, विचार मांडा, जो निर्णय आहे, तो जनता घेईल. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण डोक्यात हवा गेली नाही. याचे कारण शिवसेना प्रमुख सांगायचे पद जाते-येते, लोकांशी नम्र राहा, असे ठाकरे पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com