Aditya Thackeray: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी आदित्य ठाकरे मैदानात; जनआक्रोश आंदोलनाचा टिझर

या आंदोलनाचा टीझर आता युवासेना आणि शिवसेनेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.
aditya thackeray
aditya thackeray saam tv

पुणे - राज्यातून सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. या प्रकरणी आता शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्या प्रकरणी युवासेनेच जनआक्रोश आंदोलन उद्या पुण्यात होणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील तळेगाव येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. (Shivsena release Teaser Janakrosh agitation)

aditya thackeray
Raj Thackeray : वेठबिगारी प्रकरणाची चौकशी करा; राज ठाकरेंचं राज्य सरकारला पत्र

ज्या ठिकाणी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प होणार होता त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचा टीझर आता युवासेना आणि शिवसेनेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून रान पेटलेलं असताना आता शिवसेना या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक होताना दिसत आहे. गुरुवारी आदित्य ठाकरेंनी या निषेध आंदोलनाची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथं हा प्रकल्प येणार होता त्यामुळे आदित्य ठाकरे पुण्यात आंदोलन करणार आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असे संघर्षाचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत पण पहिल्यांदाच आदित्य ठाकरे थेट आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान देणार आहेत. ‘आमचा रोजगार, आमचा हक्क’ असा नारा देत शिवसैनिक आणि युवासैनिकांसह हजारो बेरोजगार युवक-युवती आदित्य ठाकरे यांच्या या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com