Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे लवकरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut
Shiv Sena MP Sanjay RautTwitter/@ANI

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे. मध्यप्रदेशात किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut
मराठी वेब सीरीजमध्ये हिंदी शब्द अधिक का? 'अथांग'च्या ट्रेलर लाँचच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल

103 दिवस तुरुंगात राहून परतलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोमवारी पहिल्यांदा दिल्लीत आले. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या राऊत यांचे सफदरजंग लेन या त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि पुष्पवर्षाव करून जोरदार स्वागत केले. या स्वागतामुळे खासदार राऊत भारावले होते. मात्र राजकीय टिकाटिप्पणी करण्याचे त्यांनी टाळले. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींच्या टिकास्त्राच्या पार्श्वभूमीवर सावरकर आपलेच आहेत, या भूमिकेचा राऊत यांच्याकडून पुनरुच्चार करण्यात आला.

पत्रकारांशी अनौपचारिक संवादादरम्यान खासदार राऊत यांनी तुरुंगवासातून मुक्ततेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी दूरध्वनी करून आपली विचारपूस केल्याचे सांगितले. सोबतच, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचाही मानस त्यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्रानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. तर राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेश यासारख्याराज्यांनंतर काश्मीरमध्ये श्रीनगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

मध्यप्रदेशात किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींसमवेत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. असे असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यावरून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशा प्रकारची विधाने महाविकास आघाडीमध्ये फुटीस कारणीभूत ठरतील, असा सज्जड इशाराही दिला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com