दुसऱ्याच्या जीवावर सभा घेणाऱ्यांनी टीका करू नये; मनीषा कायंदे यांचा मनसेवर हल्ला बोल

नवनीत राणा यांचे मेडिकल रिपोर्ट का व्हायरल होत नाहीत असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.
 मनीषा कायंदे
मनीषा कायंदेSaamTvNews

डोंबिवली : "ज्यांच्या सभाच दुसऱ्याच्या जीवावर चालतात त्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये. संभाजीनगरच्या सभेसाठी कोणी फंडिंग केले, कोठून माणसे आली याची खबर आमच्याकडे आहे." अशी टीका शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या होऊ घातलेल्या सभेच्या टीझरवर टीका करताना शिवसेनेला चोर सेना असे संबोधले होते. याबाबत कायंदे यांनी पलटवार केला आहे. आज कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात राज्य महिला आयोगाच्या समितीच्या सदस्यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी समिती प्रमुख सरोज अहिरे, मनीषा कायंदे, गीता जैन, सुमन पाटील, मंजूळा गावित यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत महिला बालकल्याण समिती च्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यानंतर शिवसेना प्रवक्ता व आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे देखील पाहा :

"स्कॅन की स्कॅम"

वारंवार महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्र्याची बदनामी सहन केली जाणार नाही – मनीषा कायंदे

भाजपा खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. लीलावती रुग्णालयात करण्यात आलेले स्कॅन आहे की स्कॅम आहे? तसेच सकाळपासून सर्व दिनचर्या व्हायरल करणाऱ्या नवनीत राणा यांचे मेडिकल रिपोर्ट का व्हायरल होत नाहीत असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला. राणा यांचा खरच एमआर आय झाला आहे का याची चौकशी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  हे फोटो व्हायरल रुग्णालयाच्या संगनमताने झाले असावे किंवा दबावात करायला भाग पाडले असावे अशा संशय कायंदे यांनी व्यक्त केला. तसेच वारंवार मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी शिवसैनिक खपवून घेणार नाही असा इशारा देखील कायंदे यांनी दिला आहे.

 मनीषा कायंदे
हौसेला मोल नाही! पठ्ठ्यानं घाटातंच खेरदी केला १७ लाखाचा बैल

राजद्रोह कायदा स्थगिती

राजद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून यावर बोलताना कायंदे यांनी देशभरात अनेक केसेस दाखल करण्यात आल्या होत्या यातून कोणावर अन्याय होत नाही ना? अनावश्यक कायदा लादला तर जात नाही ना? यासारखी मते आणि त्यातील दुरुस्त्या कायदे तज्ञाकडून  व्यक्त करण्यात आल्या होत्या. यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला असून हि कायदेशीर बाब असल्याने पक्ष म्हणून आपण मत व्यक्त करणार नसल्याचे कायंदे यांनी सांगितले.

 मनीषा कायंदे
असनी चक्रीवादळाचा प्रभाव, किनाऱ्यावर वाहून आला 'सुवर्ण रथ'...(पाहा Video)

लक्ष नाही असा आरोप करणे सोपे आहे. मात्र. काम करून दाखवले पाहिजे आणि शिवसेना काम करणारा पक्ष आहे - मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

डोंबिवली जवळील देसलेपाडा जवळील खदानीत ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना चित्रपट प्रमोशनमधून वेळ काढा असे भावनिक पत्र दिले होते. याबाबत बोलताना त्यांनी जिल्ह्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण लक्ष आहे. पाण्याची टंचाई महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असून त्यावर उपाययोजना सरू आहेत. नाशिक पालघर मधील पाणी टंचाईची पाहणी करत आदित्य ठाकरे यांनी स्वता जाऊन त्वरित कारवाई केली आहे. पाणी समस्येवर सरकारचे बारीक लक्ष आहे. देसलेपाडा सारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत. हा उन्हाळ्याचा काळ असून पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे. यासाठी सगळेच झटत आहेत. पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा आरोप करणे सोपे आहे मात्र काम करून दाखवले पाहिजे आणि शिवसेना काम करणारा पक्ष असल्याचा टोला आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com