जनहितार्थ जारी...शिवसेनेच्या समर्थक अपक्ष महिला आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'हा' निर्णय घेणार; शिवसेनेला पाठींबा दिलेल्या अपक्ष आमदाराची फेसबुक चर्चेत.
जनहितार्थ जारी...शिवसेनेच्या समर्थक अपक्ष महिला आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत
Shivsena supporter independent MLASaam TV

मुंबई : नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये काल रात्रीपासून वास्तव्यास आहेत. शिवाय शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार (MLA) असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, शिंदे यांनी जर शिवसेना (Shivsena) सोडली आणि सरकार धोक्यात आलं तर आता राज्यसभा आणि विधान परिषदेपेक्षा जास्त महत्व आमदारांना येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार सांभाळण गरजेच आहे. अशातच आता आजपर्यंत शिवसेनेला पाठींबा देणाऱ्या आमदारांनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता भारत जैन (Geeta Bharat Jain) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या भूमीकेबाबतची माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये (Facebook) लिहंल आहे की, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली आहे. मात्र, मी सगळ्यांना सांगू इच्छिते कि, पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Shivsena supporter independent MLA
Shivsena Political Crisis: 'या' कारणांमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवरील नाराजी वाढली

त्यामुळे एकीकडे राज्यातील राजकारण तापलं असताना अपक्ष देखील महत्वाची भूमीका बजावणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत शिवसेनेला पाठींबा देणारे अपक्ष हे सेनेकडेच राहणार की शिंदे यांच्या गोटात जाणारा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com