Shivsena : धनुष्यबाण चिन्हाबाबत आज महत्त्वपूर्ण सुनावणी

आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
shivsena
shivsena saam tv

शिवाजी काळे

मुंबई - शिवसेना (Shivsena) पक्षाबद्दलचा वाद प्रलंबित असतानाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. काल झालेल्या सुनावणीत दोनही गटाला आपलं म्हणणं लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश दिल्ली उच्चन्यायालयाने (Delhi High Court) दिले आहेत.

shivsena
Nagpur : बनावट नोटाप्रकरणी चौघांना १२ वर्षांची शिक्षा; मोठे रॅकेट उघड

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती. इतकेच नाही तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनचं धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं होत.केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल आहे.

दिल्ली हायकोर्ट आता ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर काय निर्णय घेतं? ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळणार काय? तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास मिळणार का? हे पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाचे आक्षेप काय?

निवडणूक आयोगाने नैसर्गिक न्याय नाकारला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. आयोगानं सुनावणी घ्यायला पाहीजे होती.

ठाकरे गटाला मत मांडायचा अवधी द्यायला पाहीजे होता.

एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगानं घाईनं निर्णय घेतलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com