महाराष्ट्रात पण झाडं,डोंगर हॉटेल आहेत; उद्धव ठाकरेंचा टोला

ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेचं बंड झालं महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मात्र या सगळ्यात चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे शहाजी बापू पाटील. शहाजी पाटलांच्या झाडी, डोंगर, हाटीलने एका नव्या सोशल मीडिया ट्रेंडला जन्म दिला. त्यावरुन आता उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला आहे.

हे देखील पाहा -

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात पण झाडं आहेत, डोंगर आहेत, हॉटेल आहे. महाराष्ट्र तर फारच सुंदर आहे. ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही.

Uddhav Thackeray
शिवसेनेत एवढी मोठी फूट का पडली? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वतः एक कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे आणि त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास मी ही सगळी फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱयाखोऱया छान फुलांनी बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो. पण हे काय आपल्या मातीसाठी करणार?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com