Shivsena : खरी शिवसेना आमचीच, आम्हालाच परवानगी द्या; शिंदे गटाचीही हायकोर्टात धाव

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam Tv

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी आता शिंदे गटाकडूनही हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘खरी शिवसेना (Shivsena) आमचीच, आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’ अशी मागणी या मध्यस्थी याचिकेतून करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. (Shivsena Dasara Melava Permission Latest News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? महापालिकेने घेतला मोठा निर्णय

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केलेली असताना, आता दुसरीकडे एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) गटाकडून सुद्धा हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यासाठी आपला अर्ज महापालिकेकडे आधी गेला असल्याचा दावाही सदा सरवणकर यांनी केलाय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचाही दावा सरवणकरांनी केलाय. 'याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टापासून काही महत्त्वाच्या बाबी जाणीवपूर्वक दडवल्या आहेत. खरी शिवसेना कोणती याचा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे, असंही शिंदे गटाने आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. (Shivsena Crisis Latest News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena : शिवसेनेला आणखी एक धक्का; दोन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

'शिवसेना पक्ष कोणाचा, हा वाद प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांचा गट आपणच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत मागच्या दाराने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी हायकोर्टाची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. हा हायकोर्टाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, मी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांचा प्रतिनिधी म्हणून अर्ज केला आहे' असेही सदा सरवणकर यांनी अर्जात म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालावरून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही असं पत्र महापालिकेनं दोन्ही गटांना दिलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com