
अभिजीत देशमुख
कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटचा वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटापुढे आता भाजपचे काहीच चालत नाही, असे वक्तव्य करत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी राजू पाटील यांच्या वक्तव्याला समर्थन दिलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असून शिंदे गटाचे भाजपपुढे काही चालत नाही ही वस्तूस्थिती आहे, असं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरघोडी सुरु आहेत. यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारणावरुन भाजपने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची बदली न करता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. (Political News)
या सगळ्या वादानंतर खासदारांना लोकसभा निवडणुकीत सहकार्य न करण्याचे भाजपने जाहीर केले. तसा ठराव पक्षाच्या बैठकीत घेतला. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पडदा टाकला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र पुन्हा कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर विकास कामांच्या मुद्यावर वाद झाला.
आमदार गायकवाड यांच्या विधानामुळे पुन्हा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही, असे बोलत भाजप नेत्यांची खिल्ली उडवली होती. याबाबत आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आमदार राजू पाटील हे खरंच बोलत आहेत, हे सत्य आहे.
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरु आहे. भाजप आमदारांच्या या विधानानंतर एकच खळबळ माजली आहे. आत्ता शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.