Shivsena : 'तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात, त्या...' सुषमा अंधारे यांचा बंडखोर आमदारांना इशारा

'तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष इथे आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिला आहे.
sushma andhare
sushma andhare

रुपाली बडवे

मुंबई : राज्यात शिवसेना (ShivSena) विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. उदय सामंत यांच्या वाहनाची तोडफोड झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांकडून प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला जात आहे. त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare ) यांनी शिंदे गटाच्या आमदारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष इथे आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिला आहे.

sushma andhare
Shivsena: बंडाला थंड करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे; जे. पी. नड्डांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्युत्तर

पुण्यात उदय सामंत यांचे वाहन फोडल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. उदय सामंत यांचं वाहन फोडल्यानंतर 'हा आम्हाला उकवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सातत्याने वाहन फोडण्याची भाषा केली जात होती. मात्र, अखेर प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हीही शांत बसणार नाही', असा इशारा शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला. त्यामुळे राज्यात राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिंदे गटातून प्रतिहल्ल्याची भाषा होऊ लागल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

sushma andhare
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला केला, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

सुषमा अंधारे म्हणाल्या, ' उदय सामंत यांनी किती स्टंट करावे. ज्यांनी रात्र-रात्र जागून यांचे बॅनर लावले, त्याच लोकांची नाव हे घेत आहेत. तर अब्दुल सत्तार यांना दाखवायचे आहे की,मी शिंदे यांच्या जवळचा आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेलो आहोत, हे दाखवायचे आहे. त्यामुळे ते असे वागतात. मात्र, तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात, त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष इथे आहेत'.

'शिंदे गटाच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत, मग लोक मतपेटीतून कसे हल्ले करतात ते बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ४० पैकी एकही आमदार पडला तर ते राजकारण सोडतील. आम्ही स्क्रीनशॉट काढले आहेत. जेव्हा आमदार पडतील, तेव्हा त्यांना चौकाचौकात बॅनर लावून आठवण करून देऊ, असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com