शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

2015 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधनSaam TV

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर पुरंदरे (जन्म 29 जुलै 1922) हे बाबासाहेब पुरंदरे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. भारतातील एक चांगले लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. 25 जानेवारी 2019 रोजी त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांचं बहुतांशी लेखक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहे. त्यांना शिवशाहीर म्हणून संबोधले जात होते. त्यांना मुख्यतः जाणता राजा या लोकप्रिय नाटकासाठी ओळखले जाते. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश आणि गोव्यातही लोकप्रिय होते. पुरंदरे यांनी पुण्याच्या पेशव्यांच्या इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माधव देशपांडे आणि माधव मेहेरे यांच्यासह १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण योगदानासाठीही त्यांना ओळखले जाते. 2015 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com