एकनाथ शिंदेंचा भाषण करण्यास नकार; नाराजी कायम? (पाहा Video)

काल आमदारांची विधान परिषदेच्या मतदानाची ट्रायल घेण्यात आली यावेळी नेतृत्व उपस्थित असायला हवे, अशी शिंदे यांची भावना होती.
एकनाथ शिंदेंचा भाषण करण्यास नकार; नाराजी कायम? (पाहा Video)
Eknath ShindeSaam TV

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच शिंदे यांची नाराजी कायम का? असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे.

कारण, आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम द वेस्टिन हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी मंत्री शिंदे यांना भाषण करण्याचा आग्रह शिवसेना (Shivsena) नेत्यांनी केला मात्र, आग्रह करुनही ते बोलले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे नाराज असल्याच्या चर्चां रंगल्या आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, काल आमदारांची (MLA) विधान परिषदेच्या मतदानाची ट्रायल घेण्यात आली यावेळी नेतृत्व उपस्थित असायला हवे, अशी शिंदे यांची भावना होती. पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली सेना आणि अपक्ष आमदारांची मतदानाची ट्रायल घेण्यात आली होती. त्यावरूनही शिंदे यांची नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अशातच आज त्यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करण्यास नकार दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय निवडणूका ऐन तोंडावर आल्या असताना शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याची नाराजी सेनेला महागात पडू शकते. मात्र, आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नसून विरोधकांकडून अशा बातम्या पेरल्या जात असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com