संतापजनक! पुण्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार

पुण्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Pune Girl Rape by School Bus Driver  Kondhwa Police filed Case
Pune Girl Rape by School Bus Driver Kondhwa Police filed Case SAAM TV

पुणे: पुण्यात संतापजनक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला जबरदस्तीने एका पडक्या इमारतीत नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

Pune Girl Rape by School Bus Driver  Kondhwa Police filed Case
Pandharpur : पंढरपूरात बासुंदीतून झाली विषबाधा; ३० विद्यार्थी रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) स्कूल बसच्या चालकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ही मुलगी दहावीत शिक्षण घेत आहे. पीडिता स्कूल बसमधून ये-जा करत होती. त्याचवेळी स्कूल बसचालक आणि अल्पवयीन मुलीची (Minor Girl) ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन नराधमानं तिच्यावर बलात्कार केला.

Pune Girl Rape by School Bus Driver  Kondhwa Police filed Case
पोलिसांची गाडी दारात असताना २० लाखांची जबरी चोरी; हदगावमधील खळबळजनक घटना

दहावीत शिकणारी ही मुलगी स्कूल बसमधून (School Bus) ये-जा करत असतानाच, पीडिता आणि आरोपीची ओळख झाली होती. पीडित मुलीला आरोपीने रिलेशनशिपमध्ये राहणार का, अशी विचारणा केली होती. त्यानंतर तिला एका पडक्या इमारतीत जबरदस्तीने नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार (Rape) केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी पोलीस (Pune Police) तपास सुरू आहे. पुण्यातील कोंढवा (Kondhwa) पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com