सावधान! सडक्या फळांच्या ज्यूसची विक्री; धक्कादायक VIDEO आला समोर

या व्हिडिओत एका तरुणाच्या हातात सडलेले अननस दिसत आहे
सावधान! सडक्या फळांच्या ज्यूसची विक्री; धक्कादायक VIDEO आला समोर
Rotten fruitSaam TV

भिवंडी : तुम्ही जर फळांचे ज्यूस पीत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सडलेल्या फळांचं ज्यूस बनवलं जात असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एका अज्ञात तरुणाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून व्हिडिओ समोर येताच, सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Rotten fruit
आवाज बंद करा, मी बोलत असताना मध्ये-मध्ये बोलू नका; भर बैठकीत भाजप महिला आमदार संतापल्या

व्हिडिओत नेमकं काय?

या व्हिडिओत एका तरुणाच्या हातात सडलेले अननस दिसत आहे. सदरील ज्यूस सेंटर चालक या अननसाचं ज्यूस बनवत होता. असा दावा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. शरीराला चांगला थंडावा मिळावा म्हणून आपण ज्यूस पिण्यासाठी जातो मात्र. ज्यूस सेंटर चालक कशा पद्धतीने खराब फळांचा वापर करून आपलं आरोग्य धोक्यात टाकतात हे या व्हिडिओतून दिसतंय.

Rotten fruit
पंतप्रधान मोदींनी धुतले आईचे पाय; वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट दिलं? वाचा...

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ भिवंडी येथील एका ज्यूस सेंटरचा असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडिओत अननसासह सडलेली आंबे सुद्धा दिसत आहे. या ज्यूस सेंटरची पोलखोल एका सज्ञान युवकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.

विशेष बाब म्हणजे जेव्हा हा युवक व्हिडिओ तयार करीत होता. तेव्हा ज्यूस सेंटरच्या कामगाराने हे अननस फेकून दिले आहेत. दुसरीकडे हा व्हिडिओ समोर येताच परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com