मोबाइल बँकिंग वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना

मोबाइल बँकिंग वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी - चिंचवड शहरात घडली आहे. सायबर हॅकरने जवळपास 38 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
मोबाइल बँकिंग वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना
मोबाइल बँकिंग वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटनाSaam Tv News

पुणे : मोबाइल बँकिंग (Mobile Banking) वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक (Bank Account Hacked) झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी - चिंचवड शहरात (Pimpari-Chinchwad City) घडली आहे. या बँक अकाउंट हॅकींगमध्ये (Hacking) वाकड मधील एका व्यावसायिकाला सायबर हॅकरने (Hacker) जवळपास 38 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. बँक अकाउंट सायबर दरोडा (Cyber Crime) प्रकरणात सुबोध कोरडे या व्यवसाययिकाने वाकड पोलिसात बँक अकाउंट हॅक करून पैसे चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Shocking incident of bank account being hacked even when not using mobile banking)

हे देखील पहा -

विशेष म्हणजे फिर्यादी व्यावसायिक मोबाइल बँकिंगचा वापर करत नाहीत. तसेच त्यांनी कोणालाही ओटीपी अथवा मेल पाठवला नाही, तरी देखील त्याचं बँक अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. अज्ञात भामट्यानं फिर्यादीच्या औंध येथील HDFC बँकेच्या दोन अकाऊंटमधून जवळपास 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. सुबोध कोरडे यांचे एचडीएफसी बँकेत वैयक्तिक आणि फर्मचे असे दोन खाते आहेत. या दोन्ही खात्यातून मिळून अज्ञातानं 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लांबवली आहे. 

सुबोध कोरडे यांच्या तक्रारी वरून वाकड पोलिसांनी विविध कलमांतर्गत अज्ञात सायबर दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या गुन्ह्याचा तपास वाकड पोलिसांसोबत सायबर पोलिस देखील करत आहेत. सीम स्वायपिंग करून सायबर दरोडेखोरांनी बँक अकाउंट मधून पैसे काढले असावे असा सायबर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाइल बँकिंग वापरत नसताना देखील बँक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना
अट्टल चोराकडून तब्बल अकरा दुचाकी हस्तगत

विशेष म्हणजे, सुबोध कोरडे या व्यावसायिकानं आपल्या व्यवहारासंबंधीत ओटीपी, अलर्ट्स, मेसेज, मेल किंवा बँक खात्याचा तपशील कोणालाही पाठवला नाही. तसेच ते मोबाइल बँकिंग वापरत देखील करत नाही. तरी देखील त्यांच्या बँक अकाउंटवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला कसा मारला हे शोधण्याचं मोठं आवाहन सायबर पोलिसांसमोर असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com