Mumbai Crime : आईनेच आधी गतीमंद मुलीचा गळा आवळला, नंतर तिच्या आत्महत्येचा बनाव रचला

जन्मदात्या आईनेच गतीमंद मुलीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचला. पण पोलिसांना संशय आला अन् घटनेची उकल झाली.
Mumbai Crime : आईनेच आधी गतीमंद मुलीचा गळा आवळला, नंतर तिच्या आत्महत्येचा बनाव रचला
Mumbai Crime News Update In MarathiSAAM TV

मुंबई: मुंबईत भयंकर घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या १९ वर्षीय गतीमंद मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अंधेरीतील सहार रोड परिसरातील पारशीवाडा येथे ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव आरोपी आईने रचला होता. पोलीस तपासात ही भयंकर माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime News)

Mumbai Crime News Update In Marathi
दराेड्याच्या तयारीतील सहा अटकेत; एनसीपी शहर सचिवाच्या पाेलीसांनी आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) अंधेरी येथील सहार रोड पारशीवाडा परिसरात एका महिलेने आपल्याच पोटच्या १९ वर्षीय मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्या झालेली मुलगी ही गतीमंद होती. त्याला कंटाळून महिलेने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. भयंकर म्हणजे, आईनेच तिची आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

१९ वर्षीय गतीमंद मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपास केला असता, मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या पद्धतीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी याबाबत डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह कूपर रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Mumbai Crime News Update In Marathi
संतापजनक! ७ वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवाल आल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. मुलीची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आधी हत्या केली, त्यानंतर मुलीने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. संशयाची सुई मुलीच्या आईवर गेली. पोलिसांनी मुलीच्या आईची कसून चौकशी केली. त्यावर आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.

कापडी पट्ट्याच्या साह्याने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची कबुली आरोपी महिलेने पोलिसांकडे दिली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ४१ वर्षीय आरोपी महिलेवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com