भिमा-कोरेगाव प्रकरणी धक्कादायक खुलासा; अमेरिकेतील सेंन्टीनेलच्या संशोधकांनी केला 'हा' दावा

तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलताय ते तुम्हांला अडकवण्यासाठी तुमच्या विरोधात तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं अहवालात म्हंटलं आहे.
Bhima-Koregaon
Bhima-KoregaonSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे : भिमा-कोरेगाव प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी वापरत असलेल्या उपकरणांशी स्पायवेअर आणि मालवेअरच्या माध्यमातून छेडछाड करुन त्यांच्या विरोधात पुरावे तयार केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. सायबर सिक्युरीटी संदर्भात काम करणाऱ्या अमेरिकेतील सेंन्टीनेल या संस्थेतल्या संशोधकांनी हा दावा केला आहे. (Bhima-Koregaon)

यासंदर्भातला एक अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात तपास यंत्रणांच्या (Investigation mechanism) माध्यमातून उपकरणांशी छेडछाड केली गेल्याचं त्यांनी म्हणलं आहे. तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलताय ते तुम्हांला अडकवण्यासाठी तुमच्या विरोधात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करत आहेत. आरोपींना विविध 'स्पॅम ईमेल' पाठवून त्यांच्या उपकरणांचा ताबा घेण्यात आला आणि मग त्यावरच्या पुरावे म्हणून दाखवलेले डॅाकुमेंट प्लॅंटेड केली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मॅाडिफाईड एलिफंट असं नाव देण्यात आलेल्या स्पायवेअरच्या (Spyware) माध्यमातून हे हल्ले झाल्याचं संशोधकांनी म्हंटलं आहे. महत्वाचं म्हणजे पॅगासिस या सॅाफ्टवेअरच्या माध्यमातुन यापुर्वी देखील या ॲक्टिव्हीस्ट आरोपींवर पाळत ठेवली गेल्याचा दावा करण्यात आला होता. आता हा नवा खुलासा झालाय त्यात थेट पुरावेच तयार केले गेल्याचं म्हंटलं आहे.

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे, भिमा-कोरेगाव दंगलीचा कट रचणे यापासून ते थेट पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यापर्यंतचे गंभीर आरोप करत आत्तापर्यंत जवळपास १६ जणांना अटक करण्यात आली होती. यामधील रोना विल्सन, वरवरा राव आणि प्राध्यापक हॅनी बाबु यांच्या उपकरणांमध्ये पुरावे प्लॅण्ट केले गेल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हंटलय सेंटिनेलच्या अहवालात?

१) मॅाडिफाईड एलिफॅट हे सिक्युरिटी थ्रेट वापरुन मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्यांच्या विरोधात कारवाया.

२) Gmail तसंच याहुचा वापर करुन मॅाडिफाईड एलिमेंट काम करते

३) यासाठी आरोपींना काही ईमेल पाठवले गेले. या ईमेल मध्ये मुंबई हायकोर्टाचे एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या बाजुचे जजमेंट अशा स्वरुपाच्या ॲटॅचमेंट

Bhima-Koregaon
'राहुल गांधींना ED ने चौथ्यांदा बोलावलं, मग अनिल परबांना कशाची भीती वाटतेय?'

४) हे ॲटॅचमेंट उघडल्यावर उपकरणांवरील डेटा वाचता, बदलता येणं शक्य

५) यातली एक ॲक्टिव्हिटी आणि पोलिसांचा महत्वाचा पुरावा असलेली - Details of Assassination Plot Against Prime Minister Modi ही फाईल - याच्या फॅारेन्सिक अहवालात ही फाईल मॅाडिफाईड एलिफंटच्या माध्यमातून डिलीव्हर झाल्याचे स्पष्ट.

६) काही बाबतीत अनेकदा फिशींग ई मेल पाठवून स्पायवेअर टाकण्याचे प्रयत्न झाले.

७) हे स्पायवेअर वापरणारे तज्ञ असल्याशिवाय वापर करणं शक्य नसल्याचं सेन्टिनेलचं म्हणंन.

काय आहे भिमा कोरेगांव प्रकरण?

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची धग संपुर्ण राज्यभरात पोहचली होती. दरम्यान, या प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यामुळे ही दंगल भडकल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स देण्यात आली होती. पवार या आयोगासमोर हजर देखील राहिले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com