देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे

चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाही
देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे
देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवेSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई - राज्यातील वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक कोळसा साठवणूकीचे नियोजन करण्याचे कळवले असताना  राज्य सरकारने कोळशाची साठवणूक केली नाही आणि आता केंद्र सरकारवर ठपका ठेवत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याच्या संदर्भातील आरोपासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी आपले मत मांडले.

पुढे रावसाहेब दानवे म्हणले की, महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही कारणासाठी केंद्र सरकारवर आरोप करत सुटलेले असते मग ते करोना असो,अतिवृष्टी असो,शेतकऱ्यांचे नुकसान झाले, मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण काही झाले की केंद्र सरकार जवाबदार असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे. देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना त्यांचे म्हणणे आहे की कोळसा नाही.

हे देखील पहा -

देशात चाळीस लाख मेट्रिक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे कोळसा खाण केंद्रवर सात लाख मेट्रिक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे.  भयंकर पाऊस झाल्यानंतर सुध्दा आमच्या अधिकाऱ्यांनी व कामगारांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे असे देखील दानवे म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला, कोल इंडिया ने अनेक पत्र लिहून त्यांचा कोळश्याचा हिस्सा त्यांनी उचलावा असे वारंवार सांगितले होते. मात्र महाजनकोने त्या पत्राची दखल न घेता कोणत्याही प्रकारचे शेड्युल कोल इंडिया कडे पाठवले नाही .कोळशाचे योग्य नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा देखील आरोप दानवे यांनी यावेळी केला आहे.

देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे
राजन शिंदे यांच्या खून प्रकारचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक?

पुढे दानवे म्हणाले की, परदेशातून वीस टक्के कोळसा आपल्या देशात येतो तो महाग झाला आहे. मात्र त्यापेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन आपण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत आपले उत्पादन वाढले आहे. भारतात पर्याप्त कोळसा उपलब्ध आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाह.

महाराष्ट्र बंद हा राज्य सरकारचा बंद होता,पोलीस लोकांना मारत होते दुकाने पोलिसांनी बंद केली हा जनतेचा बंद नव्हता सरकारचा बंद होता. मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. बलात्काराच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यांना दिलासा नाही ज्याकडे लक्ष द्यायचे तिकडे यांचे लक्ष नाही आणि उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाताची हे कॉपी करत बसलेत हे कॉपी सरकार आहे असे देखील रावसाहेब दानवे यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com