साताऱ्यातून १०० टॉसिलिझुमॅब इंजेक्शन पाठविले पुण्याला

साताऱ्यातून १०० टॉसिलिझुमॅब इंजेक्शन पाठविले पुण्याला
toclilzumab injection

सातारा : पुणे जिल्ह्यात टॉसिलिझुमॅब tocilizumab तुटवडा भासू लागल्याने सातारा जिल्ह्यातून १०० इंजेक्शनचा पूरवठा पुणे जिल्ह्यास करण्यात आला आहे. हे इंजेक्शन कोविड -19 च्या रुग्णांना देण्यात येते. shortage-tocilizumab-in-pune-fda-stock-diverted-from-satara-covid19-sml80

काही गंभीर आजारी रूग्णांना ग्रामीण भागातून आणि लगतच्या जिल्ह्यांमधून पुण्यातील रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे. गत आठवड्यापासून कोविडवर उपचार करणा-या रुग्णालयांना टॉसिलिझुमॅबच्या तुटवडा भासू लागला. काही रुग्णांमध्ये सायटोकाईनची समस्या जाणवून लागल्याने संबंधितांना टॉसिलिझुमॅब देणे आवश्यक असल्याने त्याचा वापर माेठ्या प्रमाणात केला जात आहे अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली. त्यासाठी पुणे जिल्ह्यापासून नजीक असलेल्या जिल्ह्यातून हे इंजेक्शन मागविले जात आहे.

toclilzumab injection
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

विभागीय आयुक्तांच्या सूचनेनूसार सातारा जिल्ह्यातून टॉसिलिझुमॅबचे शंभर इंजेक्शन toclilzumab injection (४० एमजी) आम्ही पुणे जिल्ह्याला दिले आहेत. ज्या जिल्ह्यांतून काेविड १९ च्या औषधाचा न वापरलेला मुबलक साठ्यापेक्षा जादा साठा आहे अशांची माहिती घेऊन ताे अन्य जिल्ह्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहाेत. त्याचा एक भाग असल्याचे श्याम प्रतापवार (सहाय्यक आयुक्त (औषधे) अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग यांनी दिली.

रेमडेसिव्हरप्रमाणे remdesivir टॉसिलिझुमॅबचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवश्यकतेनुसार रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी केले जाते कारण हे इंजेक्शन आयात केले जाते. या इंजेक्शनचा पुण्यातील साठा पुन्हा पुर्वत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही प्रतापवार यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बाेलताना दुजाेरा दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com