परप्रांतीयांच्या भूमिकेबाबत राज ठाकरेंनी खेद व्यक्त करावा का? चंद्रकांत पाटील म्हणाले...

'उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही.'
परप्रांतीयांच्या भूमिकेबाबत राज ठाकरेंनी खेद व्यक्त करावा का? चंद्रकांत पाटील म्हणाले...
Raj Thackray/ Chandrakant PatilSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेश, बिहारी लोकांसाठी जी भूमिका घेतली होती. त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केलं. 'उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत (Ayodhya) पाऊल ठेवू देणार नसल्याचा' इशारा उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते तसंच त्यांना मारहाण देखील केली होती त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी भूमिका भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमिवर पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भाजप खासदारांने मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे, ती पक्षाची भूमिका नाही. त्या खासदाराला योग्य ती समज दिली जाईल. राज ठाकरेंनी जी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी जी भूमिका घेतली होती. त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असल्याचंही पाटील म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली, ओबीसी आरक्षणाबाबत निकाल याच्यापेक्षा वेगळा येणं अपेक्षित नव्हतं. कोर्टाने इम्पेरीकल डेटा मागितला होता. महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही. एक आयोग नेमावा असं देखील सांगितलं होतं. मात्र, अजूनही तो आयोग नेमला नव्हता, मागासवर्गीय आयोग नाही इम्पेरीकल डेटा नाही. गांभीर्याने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहोत हे फक्त सांग दरवेळेला फसवत आहेत. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय हे सगळ्यांच्या समोर असून या सरकारने ओबीसी समाजाला फक्त लॉलीपॉप दाखवत असल्याचं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.