'एक मशाल महाराष्ट्राच्या लेकीसाठी'; श्रद्धाच्या हत्येनंतर पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पतीत पावन संघटनेच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन मशाल काढून निषेध करण्यात येत असून आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
Shraddha Walker News
Shraddha Walker Newssaam tv

प्राची कुलकर्णी

Shraddha Walker News : दिवंगत श्रद्धा वालकर हत्याकांडानं अवघा देश हादरला आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. दिवंगत श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे राज्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात दिवंगत श्रद्धा वालकरसाठी मशाल काढून निषेध करण्यात आहे. पतीत पावन संघटनेच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन मशाल काढून निषेध करण्यात येत असून आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. (Latest Marathi News)

Shraddha Walker News
Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना जंगलात सापडले १० अवयव

दिवंगत श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात (Pune) दिवंगत श्रद्धा वालकरसाठी मशाल काढून पतीत पावन संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. घडलेल्या सगळ्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी पुण्यात सारस बाग चौकात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

'एक मशाल महाराष्ट्राच्या लेकीसाठी' म्हणत पतीत पावन संघटनेकडून श्रद्धा हत्याकांडाचा निषेध करण्यात येत आहे. या मोर्चामध्ये हिंदुत्वावादी संघटनेतील सदस्याकडून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात येत आहे.

'जाती जाती मे नफरत छोडो, धर्म रक्षा की बात करो' अशा आशयाच्या घोषणाबाजी हिंदुत्वावादी संघटनेकडून करण्यात येत आहे. या आक्रमक घोषणेबाजीवरून श्रद्धा प्रकारणावरून पुण्यात वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसून येत आहे.

Shraddha Walker News
Shraddha Walkar : 54 हजारांचा मोह नडला; क्रूरकर्मा आफताब पोलिसांच्या जाळ्यात असा अडकला

दिल्ली पोलीस करणार आफताबची नार्को टेस्ट

श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांना मृतदेहाचे तुकडे मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा आरोपी आफताबला घेऊन रात्री त्याच्या घरी तपासासाठी गेले. यावेळी पोलिसांना त्याच्या घरी रक्ताचे डाग मिळाले आहेत.

श्रद्धा हत्येप्रकरणी आता दिल्ली पोलीस आफताबची नार्को टेस्ट करणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने सदर परवानगी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com