Pune: शैक्षणिक सुविधांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण; 'या' आहेत मागण्या

Pune Adivasi Students Latest News: शासनाच्या उदासिनतेचा फटका हा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना बसत असतो.
Pune Adivasi Students Latest News
Pune Adivasi Students Latest Newsज्ञानेश्वर हिंगोलीकर

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: आदिवासी सामाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या उदासिनतेचा फटका हा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना बसत असतो. याविरोधात आता आदिवासी विद्यार्थ्यांनी (Adivasi Students) आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुण्यात (Pune) आदिवासी मुला-मुलींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे. विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. (Pune Adivasi Students Latest News)

हे देखील पाहा -

आदिवासी विद्यार्थ्यांनी 'या' मागण्या केल्या आहेत

१ ) आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी D. B. T रक्कम ४५०० ऐवजी ७००० करण्यात यावी किंवा पुर्वरत जेवण चालू करण्यात यावे.

२) न्युक्लिअर बजेट अंतर्गत MSCIT, Typing ईतर कोर्सेस तात्काळ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चालू करावेत.

३ ) मांजरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १२ सुरक्षारक्षक, सफाई कामगार, पुरविण्यात यावे.

४) प्रवेश पक्रिया विलंब न करता वेळेत प्रवेश द्यावेत.

५) वसतिगृहाची ईमारत ह्या शासकीय जागेत असाव्यात.

६ ) वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात यावीत.

७ ) भोसरी आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल सोनवणे यांची बदली करावी व त्याचप्रमाणे सर्व गृहपाल यांना विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी समज देण्यात यावी.

८) शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात.

९ ) वाकड येथे स्थलांतर केलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मध्यवर्ती भागात सोय करावी.

१० ) थकित वसतिगृह व स्वंयम योजनेची DBT तात्काळ देण्यात यावीत.

११ ) मांजरी वसतिगृहातील ग्रंथालयात खुर्च्या पुरविण्यात याव्यात.

१२ ) पुणे शहरातील मुलींच्या मंजूर क्षमतेनुसार ईमारत शोधण्यात यावी.

Pune Adivasi Students Latest News
Tanya Pardazi | हजारो फूटांवरुन उडी मारली, पण पॅराशुट उघडलंच नाही; २१ वर्षीय टिकटॉक स्टार तान्या परदाजीचं निधन

१३) महाविद्यालयात प्रवेश दिल्यापासून विदयार्थ्यांना D.B.T रक्कम देण्यात यावीत.

१४ ) ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत त्यांना त्या महिन्याची D. B. T रक्कम देण्यात यावी.

१५ ) संगणक कक्षात संगणक देण्यात यावेत.

१६ )वैद्यकीय शिक्षण किंवा ईतर शिक्षण घेत असतांना त्या इंटर्नशिप कालावधीक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा.

१७) सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकल्प स्तरावर समिती स्थापन करून प्रत्येक महिन्यात बैठक घेण्यात यावी.

१८ बार्टी व सारथी च्या धरतीवर देण्यात येणार्या सोयी सुविधा TRTI ने सुरू कराव्यात.

१९) NEET, JEE, NET, SET, MPSC, UPSC, प्रशिक्षणासाठी जागांची वाढ करण्यात यावी व तात्काळ सुरू करावेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com