खलिस्तानी दहशतवाद्यांचे नवी मुंबई, नांदेडमध्ये स्लीपर सेल? पोलिसांकडे महत्वाची माहिती

महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईसारख्या भागांवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांचे नवी मुंबई, नांदेडमध्ये स्लीपर सेल? पोलिसांकडे महत्वाची माहिती
Sleeper cell of Khalistani terrorists in Navi Mumbai, Nanded? Important information to the policesaam tv

मुंबई: खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडाबाबत महाराष्ट्र पोलिसांना (Police) अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईसारख्या भागांवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे.

हे देखील पाहा

या तिनही भागात खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. एजन्सींनी सांगितले की, नांदेडपासून पंजाबपर्यंत अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे स्लीपर सेल तरुणांना खलिस्तानी अजेंड्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

याशिवाय मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या एका तरुणावरही एजन्सीची नजर आहे, सुत्रांनी सांगितले की, हा तरुण ख्रिश्चन कुटुंबातील आहे पण तो शीख धर्माचा प्रचार करण्यात खूप गुंतलेला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या तरुणाने नवी मुंबईतील अनेकांना आपल्यासोबत दिल्लीला नेले होते, असाही आरोप आहे.

चार खलिस्तानी दहशतवाद्यांचा ताबा महाराष्ट्र पोलीस घेणार

हरियाणामध्ये ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना (Khalistani terrorists) महाराष्ट्र पोलीस (Police) ताब्यात घेणार आहे. त्यांची चौकशी करुन पोलीस परतले आहेत. हरविंदर सिंग रिंडासाठी हे चारजण काम करत होते. रिंडा पाकिस्तानात बसून भारतावर दहशतवादी हल्ला कारवाईचा कट रचत असल्याचे समोर आले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.