
सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई - शिवसेनेतर्फे झोपडपट्टी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai)यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली, दिघा आणि रबाले विभागात एमआयडीसी च्या जागेवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
हे देखील पाहा -
आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने काही ठोस निर्णय आजच्या झोपडपट्टी मेळाव्यात घेण्यात येईल अशी शक्यता होती मात्र केवळ झोपडपट्यांच्या सर्वेक्षणाची घोषणा करत झोपडपट्टीवासीयांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलंय. राज्य सरकारतर्फे 2010 पर्यंतच्या झोपड्यांना सौरक्षण देण्यात आले. मात्र 2010 नंतरच्या झोपड्यांचे काय यावरही सर्वेक्षणाचे घोडे पूढे करत झोपडपट्टीवासीयांची निराशा करण्यात आली. आवल्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होईल यासंबंधी काहीतरी ठोस उपाययोजना जाहीर करण्यात येईल या आशेने झोपडपट्टी वासीयांनी मोठी गर्दी या मेळाव्यात केली होती.
मात्र माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी केवळ आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे बोलले जात आहे. कारण केवळ सर्वेक्षणाची घोषणा करायची होती तर यासाठी मेळाव्याची काय आवश्यकता असा प्रश्न आता समोर येत असून निवडणुकीच्या अनुषंगाने झोपडपट्टीवासीयांना पुन्हा केवळ गाजर दाखविण्यात आले का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.