जन्मदात्यांना 'नकोशी' झालेल्या चिमुकलीला सोडले चाकण बसस्थानकात

बाळ सुखरुप असुन बाळाला संगोपनासाठी पुण्यात पाठविण्यात आले आहे.
जन्मदात्यांना 'नकोशी' झालेल्या चिमुकलीला सोडले चाकण बसस्थानकात
जन्मदात्यांना 'नकोशी' झालेल्या चिमुकलीला सोडले चाकण बसस्थानकातSaam Tv

खेड - चाकणमध्ये नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भका जन्मदात्यांनीच सोडुन दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यभरात स्त्रीशक्तीचा जागर होत असला तरी स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या नाही आहेत. नुकत्याच जन्मलेल्या 'नकोशी' ला जन्मदात्यांनी पहाटेच्या सुमारास चाकण बसस्थानकाच्या बाजुला रस्त्यावर सोडले.

हे देखील पहा -

चिमुकलीचा रडण्याचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिक,चाकण पोलीसांच्या मदतीने चिमुकलीला चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ सुखरुप असुन बाळाला संगोपनासाठी पुण्यात पाठविण्यात आले आहे. काही तासांपूर्वीच जन्मलेली ही 'नकोशी' सुखरूप असली, तरी तिला निर्दयपणे जन्मदात्यांनीच चाकण बसस्थानकाच्या बाजुला सोडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com