Smita Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर स्मिता ठाकरे काय म्हणाल्या? वाचा...

स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Smita Thackeray Met CM Eknath Shinde
Smita Thackeray Met CM Eknath ShindeSaam TV

मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची भेट घेणाऱ्या स्मिता ठाकरे या ठाकरे कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती आहे. एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना स्मिता ठाकरे यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, शिंदे यांच्या भेटीनंतर स्मिता ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (Smita Thackeray Met CM Eknath Shinde)

Smita Thackeray Met CM Eknath Shinde
मोठी बातमी! आता ठाकरे घराण्यातही फूट?; स्मिता ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता स्मिता ठाकरेही शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर स्मिता ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी स्मिता ठाकरे म्हणाल्या की, 'एकनाथ शिंदे हे आमचे जुने शिवसैनिक आहेत आणि आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते'. असं स्मिता ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Smita Thackeray Met CM Eknath Shinde
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर CM एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. माझ्यासाठी आज ते ज्या खुर्चीवर बसले आहेत त्याचा आदर मी करते. त्यांचे कामही मला माहीत आहे. त्यांनी शिवसेनेत किती कार्य केलेले आहे ते मला माहीत आहे. मी त्यांना आदराने बघते. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. मी कुटुंबवगैरे पाहिले नाही, तर मी एक व्यक्ती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले.'

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी स्मिता ठाकरे यांना आज शिवसेना दोन गटांमध्ये विभागली आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय ?, असा प्रश्न विचारला. त्यावर 'मी राजकारणात नाही, मी समाजकार्य करते, त्यामुळे याबाबत मला काही माहिती नाही', असं म्हणत त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com