इंजिन रुळावरच, काहींना धुराचा त्रास; वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे?

'मी राजमार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील, मनसेच्या कार्यक्रमातील वेळा चुकत असल्या तरी घड्याळ बघण्याची वेळ मुळीच आलेली नाही.'
इंजिन रुळावरच, काहींना धुराचा त्रास; वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे?
Vasant MoreSaam TV

पुणे : मी राजमार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील, मनसेच्या कार्यक्रमातील वेळा चुकत असल्या तरी घड्याळ बघण्याची वेळ मुळीच आलेली नाही. स्पष्ट सांगतो मी योग्य ट्रॅक वर आहे, इंजिन रुळावरच आहे फक्त काहींना धुराचा त्रास होत असल्याचं वक्तव्य मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवरील सभेत भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे जास्त चर्चेत आले होते. दरम्यान, औरंबादमधील सभेत मनसेने भोंग्यांबाबतचा मुद्दा लावून धरत पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम देत, ४ तारखेनंतर आपण राज्यातील मशिंदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सगळे मनसैनिक मैदानात उतरले असताना मोरे मात्र देव दर्शनासाठी तिरुपतीला गेल्याने त्यांच्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांवरती मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आपण मागील दीड महिन्यापूर्वीच तिरुपतीचं (Tirupati) बुकिंग केलं होतं, तसंच मी अठरा वर्षापासून बालाजीला जातो. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर मी बालाजीला जात असतो आणि माझा बालाजीला जाण्याचा दौरा हा पूर्वनियोजित होता. आंदोलनावेळी पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी पुण्यात उपस्थित होते. तसंच एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कोणी लढाई हरत नाही. असं म्हणत मोरेंनी आपल्या तिरुपती दौऱ्याचं स्पष्टीकरण माध्यमांसमोर दिलं.

ते पुढं म्हणाले, मी राजमार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील मनसेच्या कार्यक्रमातील वेळा चुकत असल्या तरी, घड्याळ बघण्याची वेळ मुळीच आली नसल्याचं सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. तसंच स्पष्ट सांगतो मी योग्य ट्रॅक वर आहे, इंजिन रुळावरच आहे फक्त काहींना धुराचा त्रास होतोय असा टोलाही त्यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.