...म्हणून वरिष्ठांनी मला गृहमंत्रीपद दिलं नाही; अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खदखद

अजित पवार हे पक्षात नाराज असलेल्या चर्चा नेहमी सुरु असतात. याचा प्रत्येय त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीवेळी सर्वांना आला होता.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

Ajit Pawar Statement: राष्ट्रवादीचे जेष्ठनेते सध्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्ट आणि बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवारांनी आता एका कार्यक्रमामध्ये आपल्याला गृहमंत्रीपद हवं होत. मात्र, ते मिळालं नाही असं म्हणत त्यांनी मनामधली खदखद कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्याचा व्हिडीओ (Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच मला गृहमंत्री करा म्हटलं होतं. मागे अनिलरावांना (अनिल देशमुखांना) केलं नंतर म्हटलं मला गृहमंत्रीपद द्या; तरी पण दिलं नाही.

पाहा व्हिडीओ -

त्यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) दिलं. वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही असं अजित पवार बोलताचं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

अजित पवार हे पक्षात नाराज असलेल्या चर्चा नेहमी सुरु असतात. याचा प्रत्येय त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) पहाटे घेतलेल्या शपथविधीवेळी सर्वांना आला होता. त्यामुळे अजितदादा नाराज चर्चांना उधाण येत असतं. शिवाय या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं पवारांकडून सतत सांगण्यात येतं. मात्र, आता खुद्द अजितदादांनीच आपल्या मनातील खदखद भर कार्यक्रमात बोलून दाखवल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com