Kishor Aware Case: किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Pune Crime News: मावळ तालुका हादरवून सोडणाऱ्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरे यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Kishor Aware Case Updates
Kishor Aware Case UpdatesSaam TV

Kishor Aware Case Updates: मावळ तालुका हादरवून सोडणाऱ्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरे यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली हे आता समोर आलं आहे. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाईल. अशी बोलणी झाल्याचं सांगत आरोपींनी माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग फोडलं आहे. (Breaking Marathi News)

Kishor Aware Case Updates
Maharashtra Politics: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

तसेच मुलगा गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने १० लाख रुपये दिलेत. हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून लागेल तेव्हा देण्यात आले आहेत. खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण ४० ते ५० लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. (Latest Marathi News)

भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे ही जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आलं आहे.

त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी (Crime News) बनविण्यात आलं असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. मात्र, भानू पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांचे दोन पथके भानू खळदेच्या मागावर आहेत. भानू पोलिसांच्या हाती लागल्यावर आवारे खून प्रकरणातील अनेक खुलासे बाहेर येतील.

Kishor Aware Case Updates
Gadchiroli Accident News: दुचाकीवरून शाळेत निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; टिप्परच्या धडकेत शिक्षकाचा दुर्देवी अंत

मावळ तालुक्यातील (Pune News) तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. १२ मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर ७ जणांना अटक केलेली आहे, त्यांना आजा न्यायालयाने २५ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, भानू खळदे सध्या फरार झाले असून दोन पथकं त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आणि त्यांची कसून चौकशी केली असता गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. भानू खळदे हे या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com