पुण्यात नवरात्रीत लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार; तृप्ती देसाईंनी व्यक्त केली मोठी भीती

लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
trupti desai
trupti desai saam tv

सचिन जाधव

Trupti Desai News : पुणे (Pune) शहरात सध्या सोशल मीडियावर लैंगिक प्रशिक्षणाची जाहिरात प्रचंड व्हायरल झाली आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने लैंगिक प्रशिक्षणाचं तीन दिवसाचं शिबिर घेण्यात येणार आहे. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय होऊ शकतो, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.

trupti desai
Pune News : पुण्यात नवरात्र उत्सवानिमित्त 'सेक्स तंत्र' शिबीर घेणार; धक्कादायक प्रकार उघड

यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचे लैंगिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. १, २ आणि ३ ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५००० हजार रुपये घेण्यात येणार आहे. या शिबिराची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सदर लैंगिक प्रशिक्षण शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'सदर शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय होत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुणे पोलीस आणि गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.

trupti desai
Funny Video : याला कुणीतरी आवरा रे! भर रस्त्यात मद्यपीचा नागिन डान्स, व्हिडीओ Viral

दरम्यान, लैंगिक प्रशिक्षण शिबिरावर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 'लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट आहे. नवरात्री स्पेशल असं नाव या विकृत प्रकरणाला दिलं गेलं आहे. हा हिंदू आणि त्यांचा दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही. आयोजकांचा पत्ता ना नाव आणि ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणताही माहिती यावरून हे सर्व फसवं आणि घाणेरडं असून नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता आम्ही पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात याबाबतचं निवेदन देण्यासाठी जाणार असून या विकृतीला रोखण्यासाठी जे करावे लागेल ते ते आम्ही करू', अशी संतप्त प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com