पुणे महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी काढलेल्या निविदेवर, सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्षेप!

विसर्जनाचे दिवस ४ आणि फिरत्या हौदांसाठी खर्च ११ दिवसांचा
पुणे महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी काढलेल्या निविदेवर, सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्षेप!
पुणे महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी काढलेल्या निविदेवर, सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्षेप!SaamTV

पुणे : कोरोनामुळे महापालिकेने (PMC) फिरत्या विसर्जन हौदाद्वारे नागरिकांना सुविधा देण्याचे जाहीर केले आहे पण, या घनकचरा विभागाने निविदा मागवून टाकलेल्या अटी-शर्तीमुळे ठेकेदाराचेच भले होत आहे. (Social workers object to the tender issued by Pune Municipality)

गणेशोत्सवात दीड दिवस, पाचवा, सातवा आणि अनंत चतुर्दशी हे चार दिवसच विसर्जनाचे असतात. मात्र पुणे महापालिकेने थेट ११ दिवसांसाठी फिरते हौद घेतले असून, यासाठी तब्बल एक कोटी २६ लाख १९ हजार ८६० रुपये ठेकेदाराला (contractor) दिले जाणार आहेत. यामध्ये ८० लाख रुपये जास्त खर्च होणार आहेत. चार दिवसांसाठी ही निविदा काढली असती तर ४६ लाख रुपयांत विसर्जन झाले असते, हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. ही म्हणजे जनतेची लूट आहे, असा आरोप आता सामाजिक कार्यकर्ते (Social workers) करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com