सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत एनसीपीच्या पॅनेलची आघाडी

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत एनसीपीच्या पॅनेलची आघाडी
someshwar sugar factory

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमाेजणीस आज (गुरुवार) प्रारंभ झाला. या कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमाेजणीतील पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पॅनलने आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. someshwar-sugar-factory-election-result-2021-baramati-pune-latest-news-sml80

someshwar sugar factory
Rally of Himalayas : तनिका शानभागची चमकदार कामगिरी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या someshwar sugar factory संचालकपदासाठीची निवडणुकीचे मतदान नुकतेच झाले. आज (गुरुवार) सकाळपासून मतमोजणीचा निकाल काय लागणार, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे साेमेश्वर विकास पॅनल किती मतांनी बाजी मारणार याचीच चर्चा गावागावांत हाेती.

बारामती शहरातील कृष्णाई लॉन्स येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. या सुमारे ४२ टेबलांवर सुरु असलेली मतमाेजणी सायंकाळ आठपर्यंत सुरु राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास एकेक निकाल कानी आल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पॅनलच्या समर्थकांनी मतमाेजणी केंद्राबाहेर जल्लाेष करण्यास प्रारंभ केला. दरम्यान या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनेलच्या हाती काही लागणार का याची चर्चा रंगली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.