नवाब मलिक यांचे जावई 'समीर खान ड्रग्स केस' प्रकरणी विशेष न्यायालयाचा NCB ला दणका

समीर खान यांच्या रक्तात ड्रग्सचा अंश नसल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे. तसेच ड्रग्सची तस्करी करत असल्याचं कलम लागू होत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
नवाब मलिक यांचे जावई 'समीर खान ड्रग्स केस' प्रकरणी विशेष न्यायालयाचा NCB ला दणका
नवाब मलिक यांचे जावई 'समीर खान ड्रग्स केस' प्रकरणी विशेष न्यायालयाचा NCB ला दणकाSaam Tv News

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर काही दिवसांपूर्वी एनसीबीने कारवाई केली होती. एनसीबीने जुलै २०२१ मध्ये अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सेजनानीसह ड्रग तस्करीमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप करत समीर खानला अटक केली होती. मात्र आता विशेष न्यायालयाने एनसीबीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबीला चांगलाच दणका दिला आहे. (Special court slams NCB in Nawab Malik's son-in-law 'Sameer Khan drugs case')

हे देखील पहा -

याबाबत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. समीर खान यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने सप्टेंबरमध्ये त्यांची सुटका केली होती. एनसीबीने जामिनाला विरोध करत म्हटलं की, समीर हा एका सिंडिकेटचा भाग होता आणि व्यवहार, पेडलिंग आणि ड्रग्जच्या सेवनात सहभागी होता. मात्र विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जावयाच्या जामिन ऑर्डरमध्ये एनसीबीच्या तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच विशेष न्यायालयाने असेही निदर्शनास आणून दिले की, "आरोपी आणि सहआरोपींच्या जबाबाशिवाय इतर काहीही नव्हते" या व्यतिरिक्त, आरोपीची भूमिका सिद्ध करण्यासाठी कोणतीही सामग्री "फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवली नाही", असे न्यायालयाने म्हटले आहे.

नवाब मलिक यांचे जावई 'समीर खान ड्रग्स केस' प्रकरणी विशेष न्यायालयाचा NCB ला दणका
'कत्तलखान्यात कापण्यासाठी बैलांचा समावेश करावा या आदेशाचे स्वागत'

त्याचप्रमाणे समीर खान यांच्या रक्तात ड्रग्सचा अंश नसल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे. समीर खान ड्रग्सची तस्करी करत असल्याचं कलम लागू होत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे, त्यामुळे एनसीबीला मोठा दणका बसला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com