ST Bus Strike: "बडतर्फीची कारवाई ताडतोब मागे घेणार नाही" - अनिल परब

बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात सरकारला रस नाही असं असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहे.
ST Bus Strike: "बडतर्फीची कारवाई ताडतोब मागे घेणार नाही" - अनिल परब
ST Bus Strike: "बडतर्फीची कारवाई ताडतोब मागे घेणार नाही" - अनिल परबSaamTV

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप (Strike) सुरु आहे. हा संप मोडित कढण्याता प्रयत्न सरकारनं केल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाले, मात्र अनेक कर्मचारी वारंवार सुचना देऊनही कामावर हजर न झाल्याने अनेकांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली. आता या बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात सरकारला रस नाही असं असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहे. (ST Bus Strike: "Suspension action will not be withdrawn immediately" - Anil Parab)

हे देखील पहा -

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) प्रश्न उपस्थित केला की, बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार का? यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलं की, "निलंबनाची कारवाई सुरुवातीला झाली, आम्ही आवाहन केले की निलंबन (Suspension) झाले तरी कामावर परत घेईन, कारवाया मागे घेऊ... निलंबन झालेल्यांनी कामावर यावे, सर्व कारवाया मागे घेऊ असे आवाहन सहा वेळा करण्यात आले. दरम्यानच्या काळात जे कामावर रुजु झाले त्यांच्या कारवाया मागे घेतल्या. पण एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्यांची कारवाई मागे घेतली जाणार नाही. कामगारांचा समज झालाय की कामावर गेलो नाही, तरी कारवाया प्रत्यक्ष होणाराच नाहीत, आम्ही जनतेशी बांधील आहोत." असं अनिल परब म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com