ST कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर हजर राहावे, अन्यथा कारवाई करणार - अनिल परब

'आम्ही दोन पाऊले पुढे आलो आता ST कर्मचाऱ्यांनी दोन पाऊले पुढे यावे; मार्ग निघाला आहे.'
ST कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर हजर राहावे, अन्यथा कारवाई करणार - अनिल परब
Anil Parab SaamTV

मुंबई : ST कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाऊन चर्चा केली. तसेत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात त्यांची परवानगी घेतली आणि त्यानंतर त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी कामगारांची केलेली पगारवाढ, तसेच त्यांच्या फायद्यासाठी घेतलेले अन्य निर्णय यावेळी सांगितले.

हे देखील पहा -

ते म्हणाले 'विलीनीकरणाचा निर्णय हा समिती घेणार आहे तो राज्यसरकार घेणार नाही. तसेच एसटी चे यापुढील अधिक नुकसान सरकारला ही परवडणार नाही आणि कामगारांना ही परवडणार नाही, शिवाय एवढी पगारवाढ करुन देखील जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर शासन म्हणून जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ असही ते यावेळी म्हणाले.

Anil Parab
ST Strike : यापुढील ST चे नुकसान सरकारला आणि कामगारांनाही परवडणार नाही - अनिल परब

नाईलाजाने कारवाई केली जाणार -

शिवाय शासनाला जे जे शक्य आहे ते शासनाने केले आहे. शासन आर्थिक अडचणीत असतांना ही आम्ही पगारवाढीची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार (Sharad Pawar) साहेब यांनी आम्हाला सूचना केल्या होत्या त्यानुसार हा निर्णय घेतला त्यासाठी शरद पवार साहेब यांचा अनुभव आम्हाला कामाला आला. त्यामुळे आम्ही दोन पाऊले पुढे आलो आता एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पाऊले पुढे यावे आता मार्ग निघाला आहे. शिवाय उद्या शक्य त्या कामगारांनी वेळेनुसार कामावर हजर राहावे. जे मुंबईत आहेत उद्या कामावर पोहचू शकत नाहीत त्यांनी परवा कामावर रुजू व्हावे, मात्र जे कामावर रुजू होणार नाही त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

कर्मचारी विलीनीकरणावरती ठाम -

मात्र अजूनही एसटी कर्मचारी विलीनीकरणावरतीच ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांबाबत शासन नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष्य लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com