ST Strike: शिवसेनेची लोकं संप मोडायला निघालेत- सदाभाऊ खोत

लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला १२ दिवस होऊन गेले आहेत, तरी अद्याप त्याच्याविषयी कोणताही निर्णय झाला नाही. त्या संपावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ST Strike: शिवसेनेची लोकं संप मोडायला निघालेत- सदाभाऊ खोत
ST Strike: शिवसेनेची लोकं संप मोडायला निघालेत- सदाभाऊ खोत Saam Tv

मुंबई : लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला १२ दिवस होऊन गेले आहेत, तरी अद्याप त्याच्याविषयी कोणताही निर्णय झाला नाही. त्या संपावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आझाद मैदानामध्ये जे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्यावतीने रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय न मिळाल्यास सरकारचे तेरावे घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेची लोकं संप मोडायला निघालेत. बैठक घेतल्याचा दिखावा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना न्याय नाही. परिवहन मंत्र्यांनी आजून देखील कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. कामगारांची अडवणूक, परिवहन मंत्री शकुनी मामाच्या भूमिकेत आहे.

हे देखील पहा-

यामुळे कामगारांच्या संपावर अजून देखील तोडगा निघालेला नाही. आता विलिनीकरण अशक्य आहे असे सांगण्यात येत आहे. तुमच्या समितीचा विलिनीकरणाचा अहवाल हा विरोधातच येणार आहे. हे लिहून ठेवा. आम्ही काय लहान मुले आहोत का? असा सवाल खोत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुढील काळात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. एस टी कर्मचाऱ्यांची लेकरे- बाळे उपाशी आहेत. याचा कुणी देखील विचार करायला तयार नाही.

ST Strike: शिवसेनेची लोकं संप मोडायला निघालेत- सदाभाऊ खोत
ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO

समितीकडून कोणताही न्याय मिळणार नाही. कर्मचाऱ्यांची फसवणूक करु नका. जर २ दिवसामध्ये निर्णय घेतला गेला नाही, तर कर्मचाऱ्यांच्या मुलांबाळांबरोबर परब साहेबांच्या बांद्रयातील घरावर मोर्चा नेणार आहोत. यावेळी आम्हाला कितीही पोलिसांनी अडवले, तरी त्याची पर्वा करणार नाही. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र, त्याच्यावर काही तो़डगा निघाला नाही. मंत्री म्हणून आपली जबाबदारीचे भान ठेवायला हवे. बेभान होऊन चालत नाही. यामुळे पुढील दिवसांत कर्मचारी योग्य तो निर्णय घेतील, असे खोत यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com