सिल्वर ओक हल्ला प्रकरणातील ३ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

काल शुक्रवारी सिल्वर ओकवर हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.
ST workers strike
ST workers strikeSaam Tv

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Police) अटक केलेल्या ३ कर्मचाऱ्यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज या प्रकरणी राखून ठेवलेला निर्णय दिला.यात एसटी कर्मचारी संदीप गोडबोले, अजित मगर आणि मनोज मुदलीयार यांना जामीन मंजूर झाला आहे.

ST workers strike
Breaking: गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

काल शुक्रवारी सिल्वर ओकवर हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. हा निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता. या सुनावणीचा निर्णय आज न्यायालयाने दिला. या सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांनी तिनही कर्मचाऱ्यांच्या जामिनाला विरोध दर्शवला नाही.

मागिल महिन्यात राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी १०९ एसटी कर्मचाऱ्यांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांनाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोपाखली एसटी (ST) कर्मचारी संदीप गोडबोले, अजित मगर आणि मनोज मुदलीयार यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

Edited By - Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com