राज्य आणि मुंबई सुरक्षित, दिल्लीला पथक रवाना होणार - ATS प्रमुख विनीत अग्रवाल

राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवाद रोखण्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाली फ्री हॅण्ड दिले आहेत. राज्यात कुठेही दहशतवाद नसून राज्य आणि मुंबई सुरक्षित असल्याचं एटीएस प्रमुख म्हणाले आहेत.
राज्य आणि मुंबई सुरक्षित, दिल्लीला पथक रवाना होणार - ATS प्रमुख विनीत अग्रवाल
राज्य आणि मुंबई सुरक्षित, दिल्लीला पथक रवाना होणार - ATS प्रमुख विनीत अग्रवालtwitter/@ANI

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यातले दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. तर त्यातीत एक जण हा मुंबईचा आहे अशी माहिती समोर आल्यानंतर राज्यात गोंधळ उडाला आणि अनेक चर्चांना उधाण आले. आता याबाबत अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. (State and Mumbai safe, squad to leave for Delhi - ATS chief Vineet Agarwal)

हे देखील पहा -

ATS प्रमुख विनीत अग्रवाल म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. काल अटक करण्यात आलेल्या 6 पैकी एक व्यक्ती धारावी, मुंबई येथील आहे. त्याचे डी-कंपनीचे लिंक्स होते. संबंधीत इसम हा दिल्लीला ट्रेनमध्ये जात असताना कोटा येथे त्याला अटक करण्यात आली.

जान मोहम्मदकडून कोणतेही स्फोटकं किंवा शस्त्रे जप्त करण्यात आलेली नाहीत. दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस याबाबत माहितीची देवाणघेवाण करतील यासाठी आमची टीम आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे. केंद्रीय गुप्तसंस्थेने ही गुप्त माहिती दिल्ली पोलिसांना दिली त्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून मुंबई पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. जान मोहम्मदचे डी-कंपनीशी वीस वर्षांपुर्वी संबंध होते, सध्या तो धारावीमध्ये रहात होता आणि तो आर्थिक तंगीत होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे.

राज्य आणि मुंबई सुरक्षित, दिल्लीला पथक रवाना होणार - ATS प्रमुख विनीत अग्रवाल
मुंबई दहशतवादी अटक प्रकरण | पोलिस प्रोफेशनलपणे काम करतील - गृहमंत्री वळसे-पाटील

राज्य आणि मुंबई सुरक्षित

आमच्या रडारवर हजार लोकं असतात पण, सगळेच दोषी सिद्ध होत नाही. आम्हाला अनेकदा दहशतवादी हल्ल्याचे इशारे मिळत असतात पण सगळी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. एक इसम मुंबई सेंट्रलहून निजामुद्दीमकडे प्रवास करतो पण प्रवासादरम्यानच त्याला राजस्थानच्या कोटामध्ये अटक करण्यात येते यात एटीएसचे अपयश कसे असू शकते असा सवालही उपस्थित करत एटीएस योग्यरीत्या काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवाद रोखण्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाली फ्री हॅण्ड दिले आहेत. मुंबई लोकलची रेकी करण्यात आली नाही, रेकी करण्याआधीच त्याला अटक केली गेली असून त्याची चौकशी चालू आहे. सोबतच त्याच्या कुटुंबाचीही चौकशी चालू आहे. राज्यात कुठेही दहशतवाद नसून राज्य आणि मुंबई सुरक्षित असल्याचं एटीएस प्रमुख म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com