मुंबईजवळील पनवेल, भिवंडीसह ९ महापालिकांसाठी ५ ऑगस्टला आरक्षण सोडत

आज राज्य निवडणूक आयोगाने ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश दिले आहे.
Maharashtra state commission  news
Maharashtra state commission news saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ११५ नगरपरिषदा आणि ९ नगरपंचायतींसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश दिले आहे.

Maharashtra state commission  news
ठरलं! अब्दुल सत्तारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेनं आखली रणनिती

औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले आहे.

Maharashtra state commission  news
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत वाटाघाटीत व्यग्र, दुसरीकडे...'; जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी ५ ऑगस्ट २०२२ रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२२ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर ६ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल (Panvel), मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com