लम्पी आजाराबाबत राज्य शासन सतर्क, पशुसंवर्धन विभागाला मुख्यमंत्र्यानी दिले महत्वाचे आदेश

आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई: पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) पशुंना ग्रासलं आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे असेही सांगितले आहे. (Department of Animal Husbandry)

पाहा व्हिडीओ -

राज्यभरात पसरत चाललेल्या लम्पी आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जनावरांना होणाऱ्या या आजारामुळे पशुपाकांचे संभाव्य नुकसान होऊ नये. शिवाय या आजाराचे गांभीर्य ओळखत राज्य शासनाने गंभीर दखल घेतल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने अनेक सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी.

Lumpy Skin Disease
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीबाधित गावांचे पुनर्वसन होणार

तसेच रोगनियंत्रण लसीकरण (Vaccination) करण्यासाठी मोहिम राबवावी. बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध रहावे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

शिवाय लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे अशी माहितीही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com