मी लोकसभा-विधानसभेतला नाही; मात्र हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात माझे चालते - गुणरत्ने सदावर्ते

20 तारखेपर्यंत शुद्ध रहायचं असे मी तुमच्याकडून वचन घेतलं आहे; 'निलंबनाला घाबरायचं नाही, मी लोकसभेतला- विधानसभेतला नाही मात्र हायकोर्टात सुप्रिम कोर्टात माझे चालते'
मी लोकसभा-विधानसभेतला नाही; मात्र हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात माझे चालते - गुणरत्ने सदावर्ते
मी लोकसभा-विधानसभेतला नाही; मात्र हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात माझे चालते - गुणरत्ने सदावर्तेSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची पुढील सुनावनी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आज कोर्टाने दिलेल्या पुढच्या सुनावनीच्या पार्श्वभूमीवरती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे आझाद मैदान येथील पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलत होते त्यावेळी त्यांनी ST आंदोलकांना 20 डिसेंबर पर्यंत माघार न घेण्याचे आवाहन केले.

हे देखील पहा -

तसेच 20 तारखेपर्यंत शुद्ध रहायचं असे मी तुमच्याकडून वचन घेतलं आहे; 'निलंबनाला घाबरायचं नाही, मी लोकसभेतला- विधानसभेतला नाही मात्र हायकोर्टात सुप्रिम कोर्टात माझे चालते' (High Court, Supreme Court) असं वक्तव्य देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

मी लोकसभा-विधानसभेतला नाही; मात्र हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात माझे चालते - गुणरत्ने सदावर्ते
शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले - गुणरत्न सदावर्ते

दरम्यान आम्ही सर्व कामगार एकत्र आहोत आज घडलेला सारीपाट आहे. परिवहन मंत्र्यांना मी सांगत आहे की, न्यायालयाने सांगितले आहे विलीनीकरण हो किंवा नाही फक्त हे सांगायचे आहे. शिवाय 40 आत्महत्या ही कलंकित बाब आहे. जर सरकार आणखी काही करू पाहत असेल तर त्यांना माफ केले जाणार नाही. या सर्व आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. आम्ही सर्वांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com