मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लक्झरी बसवर दगडफेक; प्रवासी जखमी

या दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झाले आहे.
Raigad News In Marathi
Raigad News In MarathiSaam Tv

रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर एका लक्झरी बसवर दगडफेक करण्यात आली. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसवर रात्री काही अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची विचित्र घटना घडली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली जवळील बोरघाटात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Mumbai Pune Expressway Stone Pelting)

Raigad News In Marathi
Petrol Diesel : महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

या घटनेत बसचे काचा फुटल्या असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवासी भयभित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील फूड मॉलमध्ये काही प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही देखील पोलिसांनी सुरु केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com