मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात: कारला धडक देत गॅस टँकर उलटला; ३ ठार

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ तीव्र उतारावरती भीषण अपघात (accident) झाला
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात: कारला धडक देत गॅस टँकर उलटला; ३ ठार
Accident Mumbai Pune Expresswayदिलीप कांबळे

मावळ: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ तीव्र उतारावरती भीषण अपघात (accident) झाला आहे. गॅस टॅंकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे जाणाऱ्या २ कारवर (car) आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई (Mumbai)- पुणे मार्गावर जाऊन उलटला आहे. या विचित्र अपघातात (accident) ३ जागीच मृत्यू झाला आहे. ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज सोमवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास झाला आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.

हे देखील पाहा-

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे सहकाऱ्यांबरोबर घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत आहे. तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी आणि खोपोली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आहे आहे. दुसरीकडे, यंत्रणेकडून अपघातग्रस्त दोन्ही कार बाजूला करण्यात आल्या आहेत.

Accident  Mumbai Pune Expressway
रेशन कार्डबाबत मोठी बातमी, केंद्राने केले 'हे' बदल

गॅस टॅंकरला सुरक्षितरित्या बाजूला करण्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त टॅंकर बाजूला केला जाणार आहे. दरम्यान, सदर गॅस टॅंकर व दोन्ही कार या पुण्याहून मुंबईकडे जात होते. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाही. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.