आषाढी वारीसाठी एसटीची जोरदार तयारी, पुणे विभागातून पंढरपूरसाठी ५५० बस
Pune NewsSaam Tv

आषाढी वारीसाठी एसटीची जोरदार तयारी, पुणे विभागातून पंढरपूरसाठी ५५० बस

पुणे जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते.

सचिन जाधव

पुणे - कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून होऊ न शकलेली पंढरपूरची (Pandharpur) वारी यंदा मात्र मोठ्या थाटात होणार आहे. तब्बल २ वर्षांनी या वर्षी आषाढी वारी होणार असल्यामुळे पंढरपूर येथे मोठी गर्दी होण्याची शक्यतावर्तवण्यात येत आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. त्यात तब्बल २ वर्षांनी ही वारी होणार आहे त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून एसटी प्रशासनाने तयारी केली आहे. एसटी प्रशासनाने या वर्षी जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

हे देखील पाहा -

अंदाजे पंधरा लाख लोक इंद्राच्या वारीत सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाने जोरदार तयारी केली आहे. वाढत्या भाविकांचा आकडा विचारात घेऊन यावर्षी जवळपास ५५० गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकर्‍यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या ३-४ वर्षातील तुलनेत यंदा एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Pune News
आडनावावरून नाही तर जातीवरून जनगणना करा; राज्यसरकार विरोधात समता परिषद आक्रमक

त्याचबरोबर एखाद्या गावातून ४० लोक जर पंढरपूरला जाणार असतील तर थेट त्यांच्या गावातूनच एसटी सोडण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. एकत्र बुकींग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोडले आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. त्यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची व्यवस्था एसटी विभागाकडून या वर्षी करण्यात आली आहे.मागील चार वर्षांची तुलना करता या वर्षी सर्वाधिक गाड्या तसचं इतर अनेक सुविधा या वारीसाठी देण्यात येणार आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com