स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय विध्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

एक स्कूल बस वळण घेत असताना हा अपघात झाला.
स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय विध्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
Accident Saam tv

पुणे: स्कूल बसच्या (BUS) चाकाखाली सापडून १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात (Accident) पुण्यातील वडगाव खुर्द येथे झाला. एक स्कूल बस वळण घेत असताना हा अपघात झाला.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. पुण्यातील वडगाव खुर्द येथे एका स्कूलची बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने बारा वर्षीय अर्णव अमोल निकम (राहणार -राजयोग सोसायटी वडगाव खुर्द)याचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Accident
राहुल गांधींची ईडीने केली सलग १० तास चौकशी; तिसऱ्या दिवशीही ईडीने बोलावले

विद्यार्थ्यांना (Student) सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएल च्या बस थांब्या स्कूलबस आली. बस थांब्यावर अर्णव आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर स्कूल बस वळत असताना  चालकाचे लक्ष नसल्याने काही काळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर(वय-४९,राहणार धनकवडी) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com