पुण्यातील ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई

पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
पुण्यातील ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई
पुण्यातील ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाईअश्विनी जाधव

पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील  फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. यावेळी तिने हुतात्मा बाबू गेनू सैद यांना मानवंदना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.

हे देखील पहा -

ही मोहीम लहू उघडे यांच्या नेतृत्वाखाली आखली गेली होती, त्यामध्ये ध्रुवी पडवळ पुणे या आठ वर्षांच्या मुलीचा सहभाग होता 17,352 फूट उंची असलेल्या शिखरावर चढाई करण्यासाठी ध्रुवी आणि टीम पुण्यातून 2 सप्टेंंबर ला निघालेले होतेे आणि 9 सप्टेंबर रोजी 15420 फूट सुरक्षितरीत्या सर करून खाली आले. त्यांना उर्वरित 589 फूट उंचीची चढाई खराब हवामानामुळे थांबवावी लागली.

पुण्यातील ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई
मुंबई लोकलमध्ये बाप्पा विराजमान...

ध्रुवीने यापूर्वी कळसुबाई शिखरही सर केले आहे. ज्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. तसेच वजीर सुळका, तानाजी कडा, तैल-बैला यांसारखे सुळके लहान वयात चढून  गिर्यारोहण क्षेत्रात आपला ठसा उमटवायला तिने सुरुवात केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com