"असे बाबासाहेब पुरंदरे पुन्हा होणे नाही" - फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली...

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, असंं म्हणत फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"असे बाबासाहेब पुरंदरे पुन्हा होणे नाही" - फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली...
"असे बाबासाहेब पुरंदरे पुन्हा होणे नाही" - फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली...Saam Tv

सुशांत सावंत, मुंबई

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. "असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही" अशा भावना व्यक्त करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ("Such Babasaheb Purandare will not happen again" - Fadnavis pays homage to babsaheb purandare...)

हे देखील पहा -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही.

बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ, ‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा!

"असे बाबासाहेब पुरंदरे पुन्हा होणे नाही" - फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली...
"पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय काळाच्या पडद्याआड" - अजित पवार

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता. ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शान्ति.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com