अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !

अलिबाग येथे मंत्र्याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून काम करीत असलेल्या एका पोलिसाने शिवाजी नगर येथे आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !
अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

अलिबाग : अलिबाग येथे मंत्र्याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून काम करीत असलेल्या एका पोलिसाने शिवाजी नगर येथे आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या Suicide केली आहे. नाईक प्रशांत ठाकूर ( वय 35) असे मृत पोलिसाचे नाव आहे. Suicide by hanging of police in Alibag

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर अलिबाग Alibag पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रशांत याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घरगुती कारणामुळे प्रशात याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत ठाकूर हे अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम करीत होते. प्रशांत याची नुकतीच मंत्री महोदय याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशांत याची पत्नीही रायगड पोलीस दलात पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करीत आहे. आठ दिवसापासून प्रशांत याची पत्नी ही माहेरी गेली होती. त्यामुळे प्रशांत हे घरी एकटेच राहत होते. Suicide by hanging of police in Alibag

आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्री महोदय याचा दौरा असल्याने डिव्ही कारची चावी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी हा प्रशांत याच्या घरी आला होता. त्यावेळी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असताना प्रशांत याने दरवाजा उघडला नाही. अखेर आलेल्या।पोलीस कर्मचाऱ्याने अलिबाग पोलीस Police ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले.

अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ?

त्यावेळी प्रशांत हे फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. प्रशांत यांनी आत्महत्या का केली याबाबत स्पष्ट कारण अद्याप समजले नाही. मात्र घरगुती करणातून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com